Last Updated: Sunday, October 27, 2013, 16:02
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसुझुकीच्या स्पोर्ट्स बाईकवर बसून हेल्मेटही न घालता, दबंग खान आपल्या ‘जय हो’ या नव्या चित्रपटामधल्या अॅक्शन सीनचं शुटिंग करत होता. सलमान खानला प्रत्यक्ष बघून वर्सोवा भागातील रहिवासी क्षणभर थक्क झाले.
निळा कोट आणि शर्ट घालून सलमान खान आपल्या सिनेमाचं शुटिंग करत होता. सलमान खानला बघण्यासाठी ट्रॅफिकही थोड्या वेळासाठी थांबलं होतं. पण ट्रॅफिकचा विचार न करता सल्लू भाईने शुटींग मात्र सुरूच ठेवलं. सलमानच्या बाईक बरोबर आणखी दोन बाईक्स होत्या. एका ट्रॅकवर कॅमेरा लावून या अॅक्शन सीनचं शुटिंग करण्यात येत होतं.
या चित्रपटात सना खान व डेझी शाह या नवोदीत अभिनेत्री सलमानसोबत काम करत आहेत. तसंच तब्बूही या सिनेमाद्वारे बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांसमोर येणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, October 27, 2013, 16:02