Last Updated: Monday, April 28, 2014, 17:02
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईहीट अँड रनप्रकरणी ६ मेला अभिनेता सलमान खानला सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. याप्रकरणी २ मेला पंचांची साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यामुळं साक्षीदारांना हा खटला सुरू असलेल्या मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
या तीनही साक्षिदारांची ६ मेला साक्ष नोंदवली जाणार आहे. त्यामुळं सलमान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
28 सप्टेंबर 2002 ला सलमान खानच्या गाडीखाली चिरडून 1 जण ठार तर चार जण जखमी झाले होते. या प्रकरणाची नव्यानं सुनावणी करण्याचे आदेश न्यायलायानं डिसेंबर महिन्यात दिले होते.
२००२ सालातील हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार होता. नवीन खटल्याची सुरुवात असल्यानं न्यायालयानं सलमान खानला हजर राहण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार गेल्या सुनावणीला एका साक्षीदाराची आणि पंचाची साक्ष नोंदवली जाणार होती. त्याकरता सलमान खानला न्यायालयात हजर राहिला होता. पण साक्षीदार न्यायालायात हजर न राहिल्यानं सुनावणी २८ एप्रिलला ठेवण्यात आली होती.
याआधीच्या खटल्यात सलमान खानला हजर न राहण्याची मुभा न्यायालयानं दिली होती. या ही खटल्यात न्यायालय सलमान खानला खटल्याच्या सुनावणी दरम्यान हजर न राहण्याचे आदेश देऊ शकतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 28, 2014, 12:18