कतरिना ठरली सलमानसाठी आदर्श पत्नी, Salman Khan`s ideal wife would be Katrina Kaif, says survey

कतरिना ठरली सलमानसाठी आदर्श पत्नी

कतरिना ठरली सलमानसाठी आदर्श पत्नी

www.24taas.com, मुंबई
अभिनेत्री कतरिना कैफ हिला सलमान खानसाठी आदर्श पत्नीच्या रुपात निवडण्यात आलंय. साहजिकच, सल्लू आणि कॅटनं असं मानलं नसलं तरी लोकांनी मात्र या जोडीला सगळ्यात जास्त पसंती दिलेली दिसतेय. हीच पसंती एका मॅट्रिमोनियल वेबसाईटनं केलेल्या सर्वेक्षणामध्ये दिसून आली आणि कतरिनाची निवड झालीय सलमान खानच्या आदर्श पत्नीच्या रुपात...
मॅट्रिमोनियल वेबसाईट ‘शादी डॉट कॉम’नं केलेल्या सर्वेक्षणानुसार ६८.८४ लोकांनी कतरिनाला सलमान खानच्या आदर्श पत्नीच्या रुपात निवड केलीय. २१ हजार लोकांच्या सर्वेक्षणात जवळजवळ ७० टक्के लोकांनी म्हटलंय, की कतरिना (२८ वर्ष) हीच सलमानसाठी (४७ वर्ष) सगळ्यात आदर्श पत्नी ठरू शकेल.
मजेशीर गोष्ट म्हणजे या सर्वेक्षणातील जवळजवळ ६२ टक्के पुरुषांच्या मते सलमाननं कधी लग्नच करू नये तर जवळजवळ ६१ टक्के महिलांच्या मते सलमान खाननं लवकरात लवकर विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घ्यावा.

First Published: Wednesday, December 26, 2012, 10:21


comments powered by Disqus