सलमानच्या `किक`ची दबंगाई!, Salman Khan`s `Kick` Trailer Goes Viral

सलमानच्या `किक`ची दबंगाई!

सलमानच्या `किक`ची दबंगाई!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘दबंग’ सलमान खानचा आगामी सिनेमा ‘किक’ ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झाला आणि सलमानच्या सिनेमाच्या ट्रेलरनंही बॉलिवूड जगात आपली ‘दबंगाई’ निश्चित केलीय. ‘किक’ सिनेमाचा हा ट्रेलर केवळ दोन दिवसांत 42 लाखांनी पाहिलाय.

साजिद नाडियाडवाला यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ही अॅक्शन कॉमेडी फिल्म ‘किक’चा ट्रेलर आणि फर्स्ट लूक गेल्या शनिवारी लॉन्च करण्यात आला होता. सलमानचा ‘किक’ येत्या 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाला खूप कमी वेळ उरल्यानं सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज केला गेला. या ट्रेलरमध्ये सलमानची एन्ट्री 15 सेकंदांनंतर होताना दिसतेय. यापूर्वी प्रदर्शित करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये सलमानची एन्ट्री 40 सेकंदांनंतर होती. ही सलमानचीच आयडिया होती, असं साजिदनं म्हटलंय.

ईदच्या मुहूर्तावर सलमानचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर 48 तासांहून कमी वेळेत 42 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. हा सलमानच्या सिनेमाचा एक रेकॉर्डच म्हणावा लागेल.

तुम्ही हा ट्रेलर अजून पाहिला नसेल... तर आत्ता पाहा...





* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, June 18, 2014, 10:11


comments powered by Disqus