Last Updated: Monday, April 21, 2014, 17:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता अर्जुन कपूरनंतर आता सलमान खानची बहिण अर्पिताला नवा मित्र मिळालाय. अर्पिताच्या खास मित्राचं नाव आहे आयुष शर्मा... दोघांची मैत्री इतकी खास झालीय की आता चर्चा साखरपुड्यापर्यंत पोहोचलीय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुलगा दिल्लीत राहणारा आहे. मुंबईत तो अभिनेता होण्यासाठी आलाय. अर्पिता आयुषच्या कुटुंबियांना आणि त्याच्या आईला सुद्धा भेटलीय. दोघांनी एकत्र खूप वेळही घालवलाय. आयुषसाठीही अर्पिता खास आहे, हे त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टवरून दिसून येतंय. आयुषनं आपल्या पोस्टमध्ये अर्पितासोबत फोटो काढला आणि लिहिलं, "जेव्हा अर्पितासोबत राहतो तोपर्यंत एकही मिनिट वाया जात नाही".
दोघांच्या एका कॉमन मित्राच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली आणि नंतर भेटीचा सिलसिला सुरूच होता. खान कुटुंबही आयुषला चांगल्याप्रकारे ओळखतात आणि आयुषला आपल्या घरातील एक सदस्यच मानतात. नुकतेच दोघं जणं आपल्या कुटुंबियांसह शिमल्याला सुट्ट्यांमध्ये गेले होते. सूत्रांनी सांगितलं लवकरच त्यांचा साखरपुडा होणार आहे. दोघांचे कुटुंबियांची याला मंजुरी आहे.
काही दिवसांपूर्वी अर्पिताचं नाव अभिनेता अर्जुन कपूरसोबत जोडलं जात होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, April 21, 2014, 17:09