Last Updated: Friday, October 12, 2012, 21:59
www.24taas.com, मुंबई शाहरुख खानसह आपला आगामी चित्रपट ‘जब तक है जान’ या चित्रपटाबाबत कतरिना कैफ खूपच उत्साहीत आहे, मात्र तिला बॉलिवुडमध्ये एन्ट्री करून देणारा सलमान खान मात्र खूपच अस्वस्थ झाला आहे. या चित्रपटात कतरिना आणि शाहरुख यांच्या काही इन्टिमेट सीन्स आहेत, अशा प्रकारच्या दृश्यांमुळे सलमान नाराज झाला आहे.
या चित्रपटात सांस या गाण्यातील काही रोमांटिक सीन्स आहेत, याच दृश्यांमुळे सलमान कमालीचा अस्वस्थ झाला आहे.
यश चोपडांच्या शेवटचा चित्रपट असलेला ‘जब तक है जान’ मध्ये शाहरुखसह पहिल्यांदा कतरिना कैफ काम करीत आहे. या चित्रपटात काही गरमागरम दृश्य आहेत, त्यामुळे सलमानचा तिळपापड होत आहे. सलमान अजूनही कतरिनाबद्दल खूपच अस्वस्थ आहे.
First Published: Friday, October 12, 2012, 21:54