Last Updated: Monday, January 7, 2013, 07:10
www.24taas.com,मुंबईया ना त्या कारणाने बदनाम झालेला सलमान खान याची छबी बदलली आणि त्याचा चांगलाच बोलबाला दिसून येत आहे. सलमान खानने सोशल नेटवर्कवर आपण नंबर एकचा हिरो असल्याचे दाखवून दिलेय.
सल्लूचा दबंग सिनेमा आला आणि एका रात्रीत सल्लूमियाँ बॉलीवूडचा दबंगस्टार झाला. हीच दबंगगिरी सोशल मीडियामध्ये दिसून येत आहे. एका पाहणीनुसार सलमान खानने सोशल मीडियामध्ये स्टार कलाकारांना मागे टाकून पहिला नंबर पटकावला आहे.
सोशल मीडियामध्ये अमिताभ बच्चन यांची चलती होती. बिग बीचा पहिला नंबर होता. त्यांचेच फोटो आणि माहिती सोशल मीडियामध्ये अधिक सर्च केली जायची; परंतु आता सलमानने त्यांच्यावर मात केली. त्यामुळे अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. परफेक्टनीस्ट आमीर खान तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
सलमान खानचा चाहता वर्ग तरूण आहे. ही तरूण पिढी सलमानला अधिक पसंती देताना दिसत आहे. यू ट्यूबवर तसेच अन्य सोशल साईटवर त्याला अधिक सर्च केले जात आहे. फेसबुकवरही त्यालाच अधिक लाईक मिळत आहेत. त्यामुळे सलमानचा विरोधक शाहरूख खान मागे पडला आहे हे सांगणे नकोच. या तिघांमध्ये शाहरूखला स्थान मिळालेले नाही. मात्र, असे असताना त्याला किंग खान का संबोधले जाते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
First Published: Monday, January 7, 2013, 07:10