सलमानचं मराठी `लई भारी` - रितेश देशमुख, Salman Khan speaks great Marathi, says Riteish Deshmukh

सलमानचं मराठी `लई भारी` - रितेश देशमुख

सलमानचं मराठी `लई भारी` - रितेश देशमुख
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

या वर्षात सलमान खान ‘लई भारी’ या त्याच्या पहिल्या वहिल्या मराठी सिनेमात काम करत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत रितेश देशमुखही आहे. आणि रितेश देशमुख सध्या सलमान खानच्या मराठी भाषेची तारीफ करतोय.

‘लई भारी’ हा रितेश देशमुखची निर्मिती असलेला दुसरा मराठी सिनेमा आहे. मुख्य म्हणजे या सिनेमातून रितेश देशमुख मराठी सिनेमात पदार्पण करतोय. सलमान खानसारख्या मोठ्या अभिनेत्याने मराठी सिनेमात काम करण्यासाठी होकार दिल्याबद्दल रितेश देशमुखने त्याचे आभार मानले आहेत. रितेश देशमुखचा सलमान खानसोबत एक लहानसा सीनही या सिनेमात आहे.

स्वतः सलमान खानला सिनेमात मराठीत बोलायची इच्छा होती. सलमान खानची आई मराठी असल्यामुळे सलमान खान खुप चांगलं मराठी बोलतो. आम्ही सेटवर मराठीत बोललो. त्याच्यासोबत काम करताना खूप धमाल आली. असं रितेश देशमुख म्हणाला.

लई भारी सिनेमाचं दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक निशिकांत कामत करत आहे. निशिकांतने ‘डोंबिवली फास्ट’सारख्या मराठी सिनेमाचं तर ‘फोर्स’, ‘मुंबई मेरी जान’ या हिंदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. ‘लई भारी’ सिनेमा या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 2, 2013, 16:22


comments powered by Disqus