पहिल्यांदा सल्लू दिसला नव्या गर्लफ्रेंडसोबत, Salman Khan Spotted With His New Ladylove For The First Time

पहिल्यांदा सल्लू दिसला नव्या गर्लफ्रेंडसोबत

पहिल्यांदा सल्लू दिसला नव्या गर्लफ्रेंडसोबत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सलमानची लव लाइफ सध्या चर्चेत आहे. सलमानचं रोमानियन अभिनेत्री लुलिया वेंतूरसोबत गॅटमॅट सुरू असल्याच्या अफवांनी बी टाऊनमध्ये चर्चेला उधाण आला आहे. सध्या लुलिया सलमानसोबत त्याच्या मुंबईच्या घरात राहत असल्याची माहिती समोर येत आहे.

सलमानने लुलियाबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. ती चांगली मैत्रिण आहे की त्या पेक्षा अधिक काही असल्याचे त्याच्याकडून कोणताही खुलासा झालेला नाही.

या अफवांची बाजार गरम असताना सलमानसह त्याची तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया दिसली. दोघांना काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथील एअरपोर्टवर अनेकांनी पाहिले. सलमान हैदराबादमध्ये मेंटल या चित्रपटाच्या शुटिंगसाठी गेला आहे.

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दोघेही एकाच फ्लाइटमध्ये होते, परंतु, मीडियापासून वाचण्यासाठी ते एअरपोर्टवरून वेगवेगळे बाहेर पडले. परंतु मीडियाने या दोघांना पाहिलेच. यावेळी सलमानने फोटोग्राफरला पोज दिली पण यावेळी सलमानचा मित्र नदीम लुलियाला कॅमेऱ्यांपासून दूर घेऊन गेला. सल्लूने लुलियासाठी एक लक्झरी कार ठेवली होती, पण स्वतः टॅक्सीने तो हॉटेलला पोहचला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, June 29, 2013, 19:35


comments powered by Disqus