Last Updated: Friday, January 24, 2014, 11:33

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूडचा दबंग सलमान खान काय करील त्याचा भरवसा नाही. सध्या त्याच्या नावाची जादू बॉलिवूडमध्ये आहे. आज त्याचा `जय हो` हा सिनेमा रिलीज झालाय. मात्र, सलमान दुसऱ्याच एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. त्यांने चक्क साडी नेसायला मदत केली आहे ती सुद्धा सनी लिऑनला.
सलमानने अनेक नवोदीत अभिनेत्रींना पुढे आणले आणि त्यांना स्पेस करून दिली. भले त्याच्या जीवावर मोठ्या झालेल्या अभिनेत्रींनी त्याच्याकडे पाठ केली तरी सलमानचा ‘दिलदारपणा’ सर्वांना परिचीत आहे. सर्वांना मदत करण्यासाठी सलमान नेहमीच पुढे असतो.
आता सलमान खानने यापुढे जाऊन मदत केली आहे. यावेळी त्याने चक्क सनी लिऑनला साडी नेसण्यासाठी मदत केली आहे. स्टार गिल्ड पुरस्कार सोहळ्यात शाहरूखनचं सलमानने स्वागत केलं. यानंतर सलमानने सनी लिऑनला साडी नेसण्यासाठी मदत केली. सनी लिऑनला साडी नेसता येत नव्हती. त्यावेळी सल्लूभाई पुढे सरसावला आणि त्याने सनीभोवती साडी गुंडाळली.
यावेळी सल्लूने सनीला एक जबरदस्त टोला हाणला. मैं तुम्हें साड़ी पहनाने का गुर सिखा रहा हूं! क्योंकि तुम उसे उतारने में माहिर हो! दरम्यान, सलमानने संपूर्ण रात्र या पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केले. स्टार गिल्ड पुरस्कार कार्यक्रम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रसारित होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, January 24, 2014, 11:16