सल्लूमियाँचा पारा; चाहत्याच्या मोबाईलनं चुकविली किंमत, salman khan thrown fans mobile

सल्लूमियाँचा पारा; चाहत्याच्या मोबाईलनं चुकविली किंमत

सल्लूमियाँचा पारा; चाहत्याच्या मोबाईलनं चुकविली किंमत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘दबंग’ सलमान खानच्या आजबाजूला वावरणाऱ्या लोकांना त्याचा रागाचा पारा चांगलाच माहीत आहे. परंतु, हा रागाचा पारा कधी कधी सार्वजनिक ठिकाणी चढतो तेव्हा मात्र त्याची चांगलीच चर्चा रंगते.

आत्ताही सलमानचा पारा चढलाय आणि आपला राग व्यक्त करण्यासाठी यावेळी त्यानं चक्कं एका चाहत्याचा फोन हिसकावून घेऊन खाली आपटला. यामुळे त्याच्या चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.

झालं असं, की ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सलमान लिलावती रुग्णालयात दाखल झाला होता. त्यामुळे साहजिकच हॉस्पीलटच्या बाहेर सलमानच्या गाडीभोवती प्रेक्षकांनी एकच गराडा घातला. त्यावेळी सलमानला गाडीच्या बाहेरही पडता येत नव्हतं. त्यातही गाडी चालवतच सलमान पुढे निघाला.

यावेळी एक चाहता परवानगीशिवाय सलमानचे फोटो काढत होता. यामुळे सलमान रागाचा पारा आणखीनच चढला आणि त्यानं चाहत्याच्या हातातून त्याचा फोन हिसकावून घेतला आणि जमिनीवर फेकून दिला. राजा हमीद असं या चाहत्याचं नाव आहे.

रागावलेल्या सलमानच्या या कृतीमुळे आपल्याला खूप धक्का बसल्याचे हमीदने सांगितले. ‘सलमान हा आपला आदर्श होता. त्यामुळेच एका चाहत्याच्या बाबतीत अशा वर्तनाची अजिबातच अपेक्षा नव्हती’ असंही त्यानं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 17, 2013, 09:53


comments powered by Disqus