Last Updated: Thursday, December 27, 2012, 11:28
www.24taas.com, मुंबईहिट ऍण्ड रन प्रकरणात अभिनेता सलमान खानला आज वांद्रे कोर्टात रहायला लागू शकतं. आरटीआय कार्यकर्ती आभा सिंग यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवरील सुनावणीसाठी सलमान आणि वांद्र्याच्या वरिष्ठ निरीक्षकांना हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी जाणूनबुजून काही साक्षीदारांची साक्ष खटल्यावेळी घेतली नसल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. तसंच या प्रकरणाशी संबंध नसलेल्या एका डॉक्टरला साक्षीदार करण्यात आल्याचंही आभा सिंग यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे सलमानला त्याच्या वाढदिवशी कोर्टाची पायरी चढायला लागेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे सलमानवर काही कारवाई होणार की, तो सही सलामत सुटणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
First Published: Thursday, December 27, 2012, 11:25