Last Updated: Sunday, June 15, 2014, 20:44
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली बॉलिवूडमध्ये बरीच हवा निर्माण केल्यानंतर आज अखेर अभिनेता सलमान खान याच्या आगामी ‘किक’ या सिनेमाचा फर्स्ट लूक आणि ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.
साजिद नाडियादवाला दिग्दर्शित या सिनेमाच्या पहिलं पोस्टर आज अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आलं.
पोस्टरवर ‘दबंग’ खान एका हूडसहित टाईट शर्ट आणि सुपरहिरोच्या मास्कसहीत दिसतो. या पोस्टरवरचा फ्रेंच बिअरकट आणि वेगळ्या हेअरस्टाईलमध्ये सलमान एकदम हॉट दिसतोय याबद्दल काही शंकाच नाही. त्याचा हा लूक काहीसा हृतिक रोशनच्या ‘क्रिश’ या सिनेमासारखा दिसतोय.
सलमानचा ‘किक’ येत्या 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
व्हिडिओ पाहा - *
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, June 15, 2014, 20:38