Last Updated: Thursday, February 20, 2014, 09:46
www.24taas.com, झी मीडिया, गायत्री शंकरबॉलिवुडचा दबंग खान सलमान खानने आपला मित्र धूम-३ चं जोरदार प्रमोशन बिग बॉस सिझन ७ मध्ये केले. त्यासाठी आमीर खानची धूममधील हॅट घातली आणि धूमचे टायटल साँगही गायलं. आता हा दिलदार मित्र आणि हळवा माणूस रितेश देशमुखसाठी पुढे आला आहे. रितेश देशमुखचा आगामी चित्रपट ‘यलो’बद्दल सलमान खानने ट्विट केले आहे.
बालक-पालकच्या यशानंतर रितेश देशमुख याने स्पेशल चाईल्डसाठी ‘यलो’ नावाचा चित्रपट काढला आहे. मेन्टली चॅलेंज मुले आणि त्यांच्या पालकांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे.
रितेश देशमुख आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी ‘यलो’ चित्रपटाचे प्रोडक्शन केले असून महेश लिमये हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, हृषिकेश जोशी, मनोज जोशी, ऐश्वर्या नारकर, उषा नाडकर्णी, शिखर हितेंद्र ठाकूर, प्रविण तरडे, सागर तळशीकर, गौरी गाडगीळ आणि संजना राय यांच्या भूमिका आहेत.
स्पेशल चाइल्ड्सचा विषय ज्या नाजुकतेने हाताळला आहे, त्यामुळे सलमान खान प्रभावित झाला आहे.
पाहा हेलावणारा `यलो`चा ट्रेलर....
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 20, 2014, 09:32