सलमानच्या घरात तमाशाखोर महिलांचा घुसण्याचा प्रयत्न , Salman Khan's house outside the mother - daughter commotion,

सलमानच्या घरात तमाशाखोर महिलांचा घुसण्याचा प्रयत्न

सलमानच्या घरात तमाशाखोर महिलांचा घुसण्याचा प्रयत्न
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गुरुवारी रात्री मायलेकींनी धुडगूस घातला. सिनेमात काम मिळवण्यासाठी सलमानच्या घरी फे-या मारणा-या या मायलेकींची निराशा झाली त्यावेळी त्यांना राग अनावर झाला.

रागाच्या भरात त्यांनी सलमानच्या घराबाहेर तमाशा केला. सलमानच्या नावाने खडे फोडत दोघींनी त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. रस्त्यावरच्या येणा-या जाणा-यांना आणि पोलिसांनाही या मायलेकींनी सोडलं नाही. त्यांच्यांशीही या दोघींनी असभ्य वर्तन केलं.

दिल्लीहून आलेल्या या दोघींनी सलमानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. सलमानच्या बॉडीगार्डनी त्यांना रोखलं. त्यांनी मग आपला राग येणा-या जाणा-यांवर काढला. इतकंच नाही तर आपल्या कारने पोलिसांच्या मोटारसायकला धडक दिली.

शिवाय पोलीस स्टेशनकडे जात असताना रस्त्यावरील अनेक बाईकस्वारांना ओव्हरटेक केलं. पोलीस स्टेशन त्यांनी डोक्यावर घेतलं. पोलिसांनी त्यांच्या ड्रायव्हरला अटक केली असून दोघींविरोधात गुन्हा दाखल केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 30, 2013, 11:02


comments powered by Disqus