शाहरुखच्या ‘ओव्हर अॅक्टिंग’वर सलमानचा टोमणा Salman on SRKs over acting

शाहरुखच्या ‘ओव्हर अॅक्टिंग’वर सलमानचा टोमणा

शाहरुखच्या ‘ओव्हर अॅक्टिंग’वर सलमानचा टोमणा
www.24taas.com, मुंबई

एका जाहिरातीचं शुटिंग करत असताना जेव्हा सलमान खानला सूचना करण्यात आल्या, तेव्हा सलमान खान विलक्षण संतापला. संतापाच्या भरात आपला शत्रू असलेल्या शाहरुख खानसारखं तोंड करत शाहरुखला टोमणा मारला.

४७ वर्षीय सलमान खान आपल्या रागाबद्दल प्रसिद्धच आहे. या जाहिरातीत सलमान खानला वॉक करण्यास सांगितलं, तेव्हा त्याला नकार सलमान खान म्हणाला, की जर वॉकच करायला कुणी हवं होतं, तर एखाद्या मॉडेललाच बोलवायचं ना!

काही वेळाने जेव्हा स्टंट डायरेक्टरने जेव्हा सलमानचा एक्स्ट्रिम क्लोज अप शॉट घेताना आणखी एक्सप्रेशन्स देण्याची सूचना केली, तेव्हाही सलमान खान वैतागला आणि म्हणाला, की अॅक्टिंगच हवी होती, तर ऋतिक रोशनला घ्यायचं ना!

एवढ्यावरच सलमान थांबला नाही... तो शाहरुखवरही घसरला... 'आणि तुम्हाला जर ओव्हर अॅक्टींगच हवी होती तर शाहरुख खानला घ्यायचं' असं म्हणत त्यानं पुन्हा एकदा अप्रत्यक्षरित्या शाहरुखला टोमणा मारला.

First Published: Monday, February 4, 2013, 23:03


comments powered by Disqus