सलमान करीनाशी अंगलट करताना `चक्क` लाजला! Salman refuses to get intimate with Mrs Kareena Kapoor Khan?

सलमान करीनाशी अंगलट करताना `चक्क` लाजला!

सलमान करीनाशी अंगलट करताना `चक्क` लाजला!
www.24taas.com, मुंबई

सलमान खानला सगळे भाई म्हणतात... आणि तो खरंच भाई असल्याचं त्याने नुकतंच दाखवून दिलं. ‘दबंग २’च्या नव्या फेव्हिकॉल या गाण्यात विवाहीत करीना कपूर- खानसोबत खट्याळ आयटम साँग करताना सलमान खानने तिच्याशी अंगलट करायला नकार दिला.

करीनाने विवाह झाल्यानंतर दबंग २ मध्ये आयटम साँग करत पुन्हा कामावर रुजू झाली. फेव्हिकॉल आयटम साँग हे मुन्नी बदनाम पेक्षाही अधिक चावट आणि खट्याळ असणार आहे. या गाण्यासाठी करीनाच असावी, असा सलमान खानचा आग्रह होता. मात्र लग्नानंतर जेव्हा करीना या डान्सची तालीन करत होती, तेव्हा नृत्यदिग्दर्शिका फराहा खानने सलमानलाही डान्स करत करीनाच्या अंगलट करण्यास सांगितलं.

मात्र यावेळी सलमान खान चक्क लाजला. आपली जवळची मैत्रीण असणाऱ्या करिश्मा कपूरची धाकटी बहीण असणाऱ्या करीनाला सलमान आपली धाकटी बहीण मानतो. त्यामुळे तिच्यासोबत गाण्यात चावट हलचाली करताना सलमानला शरमल्यासारखं झालं. हिच अवस्था त्याची ‘मुन्नी’ च्या वेळी वहिनी मलायका सोबत नाचताना झाली होती.

करीना मात्र पूर्णपणे प्रोफेशनल असल्यामुळे तिने कुठलीही हरकत घेतली नाही. पतौडी खानदानाची सून असूनही करीनाला मनाप्रमाणे काम करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.

First Published: Wednesday, October 31, 2012, 13:54


comments powered by Disqus