सलमान देणार निर्मात्यांना पगार! Salman`s new Business module

सलमान देणार निर्मात्यांना पगार!

सलमान देणार निर्मात्यांना पगार!
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूड मधील सुपरस्टार अभिनेता सलमान खानने प्रोड्यूसर्ससाठी एक नवा बिझनेस फंडा सुरू करत आहे. सलमानच्या दिलदारीबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. आता नव्या बातमीनुसार सलमान खान एक बिझनेस मॉड्यूल आखणार आहे, या बिझीनेस मॉड्यूलचा फायदा प्रोड्यूसर्सना होणार आहे.

सलमानच्या या बिझनेस मॉड्यूलच्या अनुसार निर्मात्यांना सुध्दा कलाकार आणि क्र्यु प्रमाणे निश्चित वेतन मिळणार आहे. ही रक्कम कदाचित १५ ते २० कोटींपर्यत जाऊ शकते आणि प्रॉडक्शन कॉस्टनंतर सलमान उरलेले रक्कम स्वतःकडे ठेवणार आहे. काही जणांच्या मते सलमानने बिझनेस मॉड्यूलबद्दल अतिआत्मविश्वास दाखवला आहे. असा प्रकार करून सलमान स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. कारण अपेक्षेप्रमाणे जर एखादा चित्रपट बॉक्सऑफिसवर नाही चालला तर सलमानचं मोठं नुकसान होईल.

मात्र ही बाबही खरी आहे की सलमानने रिलीज केलेल्या अनेक सिनेमांनी १४० ते १५० कोटींपर्यत व्यवसाय केला होता. हे पाहता सलमान तोट्याचा विचारच करत नाहीये.

फिल्म ट्रेड अनालिस्ट अमोद मेहरा म्हणाले की शाहरूख खान, आमिर खान आणि अक्षय कुमार या अभिनेत्यांनी आधीच अशी बिझनेस मॉड्यूल्स सुरू केली आहेत. सलमानच्या मागच्या महिन्यात रिलीज झालेल्या एक था टायगर या सिनेमाने बॉक्सऑफिसवर नवा रेकॉर्ड केलाय. एक था टायगर या चित्रपटाने ११ दिवसांत २०० कोटीची कमाई केली आहे. त्यामुळे सलमानने अशा बिझनेस मॉड्यूलचा विचार करणं रास्त आहे.

First Published: Wednesday, October 3, 2012, 17:27


comments powered by Disqus