सलमानची इच्छा `लग्नानंतर व्हावी पहिली मुलगीच!`, Salman Wants girl child after marriage

सलमानची इच्छा `लग्नानंतर व्हावी पहिली मुलगीच!`

सलमानची इच्छा `लग्नानंतर व्हावी पहिली मुलगीच!`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सलमानच्या लग्नाचा पत्ता नसला, तरी कधी लग्न झालंच तर आपल्याला कन्यारत्न व्हावं अशी सलमानची इच्छा आहे. मुंबई दबंग सलमान त्याच्या चित्रपटांनी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो त्याच्या प्रेमप्रेकरणांमुळेही सगळ्यांचे लक्ष वेधतो. सलमानची छोटीतली छोटी गोष्टदेखील चर्चेचा विषय बनते.

सलमानचं लग्न हा बॉलीवूडमधला सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. त्यातून आता अविवाहीत सलमानला बाळस्वरुपात मुलगी असावी असे एका पत्रकार परिषदेत त्यांने सांगितले आहे. `बिइंग ह्युमन फाउंडेशन`ची निर्मिती करणारा सलमान एका कार्यक्रमाला गेला होता. हा कार्यक्रम होता, मुली आणि महिला सशक्तीकरणाचा. यावेळी सलमानने त्याच्या मनातल्या लहान मुलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

सलमान म्हणाला की, माझं लग्न झालं आणि मला भविष्यात कधी मुल होईल ते मुलगीच असावी. अशी माझी मनापासून इच्छा आहे. सलमानच हे स्वप्न लवकरच पूर्ण होवो.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 8, 2013, 00:05


comments powered by Disqus