१२.१२.१२ आयटम गर्ल संभावना सेठची पार्टी, Sambhavana Seth Birthday party

१२.१२.१२ आयटम गर्ल संभावना सेठची पार्टी

१२.१२.१२ आयटम गर्ल संभावना सेठची पार्टी
www.24taas.com, मुंबई

१२.१२.१२ या तारखेची मोहिनी साऱ्यांनाच पडली होती. सामान्यांपासून ते सेलिब्रिटी सगळेच ह्या तारखेच्या मुहुर्तासाठी आतूर झाले होते. त्यामुळे अनेकांनी १२.१२.१२च्या मुहुर्त साधत अनेक चांगल्या गोष्टी केले. त्याबाबतीत आयटम गर्ल संभावना सेठ ही सुद्धा मागे नव्हती. संभावना सेठचा वाढदिवस हा १२.१२.१२ ला असल्याने तिचा आनंद चांगलाच दुणावला होता. आयटम गर्ल संभावना सेठने तिच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टी दिली होती. आणि तिने ह्या पार्टीत बरीच धमाल केली होती.

अभिनेत्री व नर्तिका संभावना सेठ हिने `१२.१२.१२`ला आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन केले होते. संभावना सेठने अतिशय जोरदार सेलिब्रेशन केल्याचे समजते.

ह्या मुहुर्तावर संभावनाने पार्टी केल्याने तिच्यासाठी हा वाढदिवस अविस्मरणीय राहणार आहे. ह्याच मुहुर्तावर अनेकांनी आपापल्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी केल्या होत्या.

First Published: Friday, December 14, 2012, 15:48


comments powered by Disqus