Last Updated: Monday, January 20, 2014, 13:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसंजय दत्तला दिलासा मिळालाय. संजय दत्तची पॅरोलची मुदत ३० दिवसांनी वाढवण्यात आली. मान्यता दत्तच्या उपचारासाठी त्याला मुदत वाढवून देण्यात आलीय.
अभिनेता संजय दत्तनं महिनाभर सुट्टी वाढवण्यासाठी अर्ज केला होता. संजय दत्त सध्या पॅरोलवर येरवडा जेलमधून घरी आहे. संजयनं त्याची पत्नी मान्यता हिला टीबी असल्याचं नमूद केलंय. यामुळं संजय दत्तची पॅरोल आणखी वाढण्याची शक्यता होती.
संजय दत्तनं यापूर्वी घेतलेल्या पॅरोलवर वादंग निर्माण झालं होतं. संजय दत्तला मान्यताच्या शस्त्रक्रियेसाठी २१ डिसेंबरपासून पॅरोलची सुटी मिळाली आहे. संजय दत्तची ही सुटी ६ डिसेंबर रोजी मंजूर झाली होती. मात्र एका चित्रपटाच्या प्रिमियरला मान्यतानं उपस्थिती लावली होती. यामुळं या पॅरोलवर वाद झाल्यानं संजय दत्तला १५ दिवसानंतर बाहेर येता आलं. यानंतर संजय दत्तनं पत्नीला टीबी असल्याचं सांगितल्यानं संजय दत्तची वाढविण्यात आलीय.
संजय दत्तवर मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटच्या काळात अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संजय दत्त सध्या येरवडा जेलची हवा खातोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 20, 2014, 13:38