Last Updated: Thursday, May 30, 2013, 16:36
www.24taas.com, झी मीडिया, पुणे`लगे रहो मुन्नाभाई` चित्रपटाच्या माध्यमातून गांधीगिरीचा पाठ शिकविणाऱ्या, `शब्द` सिनेमात लेखकाची भूमिका करणाऱ्या संजय दत्तने सही करण्यापलीकडे गेल्या ३० वर्षांत कोणत्याही कामासाठी पेन हातात घेतला नाही. त्यामुळे कोणता शब्द कसा लिहावा हेच तो विसरला आहे.
संजय दत्तला लिहिता येत नसल्याचा प्रत्यय येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्यांना आला. सध्या संजय दत्तला लिहिण्यासाठी दुस-या व्यक्तीची मगत घ्यावी लागत आहे, अशी माहिती विश्वतसनीय सूत्रांनी दिली. काही दिवसांपूर्वी संजय दत्तला कँन्टिनमधील कोणत्या गोष्टी हव्या आहेत. याची यादी मगविण्यात आली. त्यासाठी संजय दत्तकडे पेन व कागद देण्यात आला. त्यावर तो म्हणाला ``मला लिहिता येत नाही.”
“लिखाण करण्यासाठी माझ्याकडे रायटर होते. सुमारे तीस वर्षांपासून मी केवळ सही कारण्यासाठीच पेन हातात घेतला आहे.दुसरे काहीही लिहलं नाही. त्यामुळे कँन्टिनमधील वस्तूंची यादी मला लिहिता येत नाही.`` असं संजय दत्तनं सांगितलं आणि सारेच आश्चर्यचकीत झाले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 30, 2013, 16:36