Last Updated: Tuesday, February 18, 2014, 19:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई अभिनेता संजय दत्त याला पुन्हा एकदा वाढीव पॅरोल रजा मंजूर करण्यात आलीय. पत्नी मान्यता दत्त हिच्या आजारपणाच्या निमित्तानं त्याला आणखीन महिनाभराची वाढीव रजा मंजूर झालीय.
यामुळे, आता संजय दत्त २१ मार्च २०१४ पर्यंत जेलबाहेरच राहणार आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त यानं त्याची पत्नी मान्यता दत्त हिच्या आजारपणाचं कारण देत पॅरोज रजा वाढवून मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मंजूर करण्यात आलाय.
जेल मॅन्युअल्सच्या नियमांनुसार, एखाद्या कैद्याला जास्तीत जास्त ९० दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली जाऊ शकते. संजय दत्त याची ६० दिवसांची पॅरोल रजा २१ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. म्हणजेच, नियमांनुसार २१ मार्चनंतर संजयची पॅरोल रजा वाढविता येऊ शकत नाही.
महत्त्वाचं म्हणजे, गेल्या आठवड्यात संजय दत्तनं पत्नी मान्यता हिच्या आजारपणाचा दाखळा देत पॅरोल वाढविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. नुकतीच मान्यतावर एक शस्त्रक्रियाही पार पडलीय. डॉक्टरांनी तिला आराम करण्याचा सल्लाही दिलाय. अशा वेळेस संजयला आपल्या पत्नीसोबत राहायची इच्छा आहे.
गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी संजय दत्त पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला होता. मान्यता दत्त हिच्या आजारपणामुळे २१ जानेवरीला संजयनं पॅरोल वाढविण्यासाठी अर्ज केला होता. गेल्यावेळच्या पॅरोलचा अवधी २१ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. त्यानंतर आता संजयला सलग तिसऱ्यांदा पॅरोल दिला गेलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 16:12