Last Updated: Thursday, February 13, 2014, 11:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता संजय दत्तला वाढीव पॅरोल मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. संजय दत्तची पत्नी मान्यताच्या आजारपणाचं तथ्य समजावून घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल खार पोलिसांकडे सादर केलाय.
मान्यताला छातीचा आणि पोटाचा टीबी असल्याचा अहवाल दिला. या आजारामुळे मान्यताला काही दिवसांककरता हॉस्पिटलायझेशन आणि शस्त्रक्रिया करणे गरजेचं असल्याचा अहवाल दिला.
हा अहवाल आता खार पोलिसांकडून आता शासनाकडे दिला जाईल. मात्र मान्यताच्या आजारपणाचं गंभीर स्वरुप समोर आल्याने संजय दत्तच्या वाढीव पॅरोल मिळण्याच्या मागणीला निश्चितच बळ आलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 11:17