संजय दत्तचा चिमुकला सिनेमात, `हसमुख पिगल गया` दिसणार, Sanjay Dutt, the son of a movie,

संजय दत्तचा चिमुकला सिनेमात, `हसमुख पिगल गया` दिसणार

संजय दत्तचा चिमुकला सिनेमात, `हसमुख पिगल गया` दिसणार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता संजय दत्त याचा तीन वर्षांचा मुलगा शहरान हा सिनेमात चमकणार आहे. `हसमुख पिगल गया` या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संजय दत्तचा मुलगा शहरान दत्त त्यांच्याच `हसमुख पिगल गया` या सिनेमातून `होम प्रोडक्शनमधून` येत आहे. या चित्रपटातील गाण्यात तो दिसणार आहे. शहरानसोबत या चित्रपटाच्या माध्यमातून संजय दत्तची भाची नाझीया हुसेन देखील बॉलिवूडमध्ये `एण्ट्री` घेण्यास सज्ज झाली आहे.

नाझीया मोहीत सुरीच्या आशिकी-२ च्या रिमेकमध्येही काम करणार असल्याचे समजते. दिग्दर्शक सेजल शहा `हसमुख पिगल गया` चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 12, 2014, 12:51


comments powered by Disqus