Last Updated: Tuesday, September 24, 2013, 19:16
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीसध्या तुरूंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त एका नाटकात भूमिका करणार आहे. तुरूंग अधिकाऱ्यांतर्फे दरवर्षी दोन तासांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यातून मिळणारं उत्पन्न कैद्यांच्या कल्याणार्थ तसंच कैद्यांना सोयी-सुविधांसाठी खर्च केले जाते. हा कार्यक्रम २६ सप्टेंबरला पुण्यातील एका थिएटरमध्ये होणार आहे.
येरवडा तुरूंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९३ बॅाम्बस्फोटातील आरोपी अभिनेता संजय दत्तवर आधारीत हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम नक्कीच यशस्वी होईल. असा विश्वास तुरूंग अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. कार्यक्रमाची पटकथा आणि निर्मिती तुरूंगातील कैद्यांचीच आहे.
२६ सप्टेंबरला दुपारी दोन तासांचा हा कार्यक्रम संजय दत्तसोबत ४५ कैदी सादर करणार आहेत. महाराष्ट्राची लोक संस्कृती, परंपरा आणि सध्या याची आवश्यकता यावर आधारीत हा कार्यक्रम असणार आहे. कैदी या कार्यक्रमासाठी उत्साहित असून ते कार्यक्रमाची तयारी करत आहेत. असंही तुरूंग अधिकाऱ्यांनी म्हटलंय.
याच धर्तीवर एक कार्यक्रम येरवडा तुरूंग परिसरात याआधी घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उत्पन्न कैदी कल्याण निधीला देण्यात आले होते. २६ सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात काही महिला कैद्यांही सहभागी होणार आहेत.
संजय दत्त या कार्यक्रमात फक्त अभिनय करणार नसून चेन्नई एक्सप्रेस` च्या प्रसिध्द ‘लुंगी डान्स’ या गीतावर थिरकणार आहे.
१९९३ च्या बॅाम्बस्फोटातील आरोपी अभिनेता संजय दत्तला पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेली असून त्यापैकी दीड वर्ष संजय दत्त याआधीच तुरूंगात काढलेले आहे.उरलेली साडेतीन वर्षांची शिक्षा सध्या तो भोगत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 24, 2013, 19:16