सलमानने कोणाची उडवली झोप?, Sanjay leela bhansali get rid of salman khan

सलमानने कोणाची उडवली झोप?

सलमानने कोणाची उडवली झोप?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवुड अभिनेता सलमान खान आजकाल जे काही करतो त्यातून त्याची दंबगगिरी झळकत असते. त्याने अशीच आपली दबंगगिरीची झलक एका निर्मात्याला दाखवून दिली आहे. सलमान सध्या त्याचा आगामी सिनेमा मेंटलचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. त्याच्या व्यस्त वेळपत्रकावर सगळे निर्माते डोळा ठेवून असतात.

निर्मात्यांमध्ये सलमानच्या सिनेमांच्या प्रदर्शनाच्या तारखामुंळे एवढे घाबरलेले असतात की, कोणता दुसरा निर्माता त्याच्या तारखेच्या आसपास आपला सिनेमा प्रदर्शित करताना दहा वेळा विचार करतो. सलमानचे सिनेमा प्रदर्शित होण्याच्या तारखेवरून चर्चा रंगतात. त्यानंतर ते आपले सिनेमे रिलीज करण्याच्या योजना आखतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय लीला भंन्साळी सध्या रामलीलाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण सलामानने संजय लीला भंन्साळी यांची झोपचं उडवली आहे. झोप उडण्यामागे घडलयं अस की, भंन्साळी यांच्या रामलीलाच्या एक आठवड्या आधी सलमान मेंटल सिनेमा रिलीड करण्याच्या विचारात आहे. सलमान मेंटलचं शूटींग जलद गतीने पूर्ण करून तो सिनेमा यावर्षीचं प्रदर्शित करण्याच्या बेतात आहे. प्रशंसकांचा विचार लक्षात घेता सलमानने हा निर्णय घेतला आहे. मेंटलच्या प्रदर्शनाची संभाव्य तारीख २२ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे संजय लीला भंन्साळीच्या रामलीलाची प्रदर्शन तारीख २९ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे संजय लीला भंन्साळी यांच्या अडचणी आणखीनच वाढल्या आहेत, कारण सलमानच्या सिनेमापुढे दुसऱा कोणताही सिनेमा टिकत नाही.

First Published: Monday, April 29, 2013, 13:42


comments powered by Disqus