Last Updated: Saturday, August 10, 2013, 10:11
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईओशीवरा येथे बिग बॉस फेम टीव्ही स्टार सारा खानच्या कारला अपघात झालाय. त्यात चार जण जखमी झालेत. सारा खानचा मित्र कार चालवत होता. मद्यधुंद अवस्थेत सारा होती.
एका पार्टीतून परतत असताना ओशीवरा येथे हा अपघात झालाय. ड्रँक अँण्ड ड्राईव्हची केस आहे काय याबाबत पोलीस तपास करतायेत. शनिवारी मध्यरात्री ३.२०च्या सुमारास अपघात झाला. मेगा मॉलजवळ ओशिवरा लिंक रोडवर साराची गाडी दुभाजकावर आपटल्यामुळे अपघात झाला.
सारासह गाडीतील सर्व व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होते, असे स्थानिकांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय चाचणी केली आहे. चाचणीचा अहवाल आल्यावरच ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 09:47