Last Updated: Wednesday, July 3, 2013, 14:54
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईआपल्या कसदार अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणारे विनोदी अभिनेते सतीश तारे यांचे आज अंधेरी येथील सुजय हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना आपली श्रद्धांजली द्या.
तारे यांच्या पायावर नुकतीच छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पायाची जखम त्यांच्या जीवनाची अखेर ठरली. अशा हरहुनरी कलाकाराला सर्वच थरातून आदरांजली वाहण्यात येत आहे. अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता.
सध्या रंगभूमीवर ‘गोडगोजिरी’ हे नवे नाटक सुरू होते. या नाटकाचे काही प्रयोगही झाले होते; मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला छोटी जखम झाली होती. त्याशिवाय त्यांच्या पायाला सारखी सूज येत होती. पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
खालील बॉक्समध्ये आपले नाव, पत्ता आणि इ-मेल टाईप करा. त्यानंतर आपली श्रद्धांजली पर प्रतिक्रिया लिहा.
First Published: Wednesday, July 3, 2013, 12:48