Last Updated: Friday, May 24, 2013, 16:45
www.24taas.com, झी मीडिया, पॅरिस जगभरात गाजलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दुसऱ्यांदा चोरीची घटना घडलीय. यावेळेला २६ लाख डॉलर्सचा हिऱ्यांचा हार चोरांनी उडवलाय.
कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्याच आठवड्यात स्विस ज्वेलर्स शोपार्ड यांचे १४ लाख डॉलर किंमतीच्या दुर्मिळ स्टोन्सची चोरी झाली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या २६ लाख डॉलर्सच्या हिऱ्यांच्या हारासोबतच इतर दागिने परिधान करून २० मॉडल्सनं इथल्या ‘हॉटेल डू कॅप इडन रॉक’मध्ये रॅम्पवॉक केला होता. या भव्य कार्यक्रमात शेरन स्टोन आणि पॅरिस हिल्टन हेही उपस्थित होते.
या दुर्मिळ आणि किंमती दागिन्यांच्या सुरेक्षेसाठी ८० बॉडिगार्ड, स्थानिक पोलीस, हॉटेलचे सुरक्षारक्षक तसेच डे ग्रिसोगिनोचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या सगळ्यांना चोरांनी चांगलंच चकवलंय.
रात्री उशीर सुरु झालेल्या तपासणी दरम्यान २६ लाख डॉलर किंमत असलेला हार गायब असल्याचं उपस्थितांच्या लक्षात आलं आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तपास सुरू केलाय परंतू कोणत्याही प्रकारचा पुरावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 24, 2013, 16:42