Last Updated: Wednesday, October 30, 2013, 12:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शाहरुख खान आणि जूही चावला बॉलिवूडमधली ‘बेस्ट जोडी’ त्यांच्यातील मैत्रीसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण आता तसं राहिलं नाही, यांच्या मैत्रीत आला आहे थोडासा दुरावा.. हे आम्ही नाही तर चक्क जुहीनंच सांगितलंय.
“आमच्या क्षेत्रात कोणाचीच मैत्री फार काळ टिकत नाही. आम्ही आमच्या कामात खूप व्यस्त असतो त्यात शाहरुख इतरांपेक्षा जरा जास्तच व्यस्त असतो. त्यामुळं आमच्याकडे मैत्रिसाठी वेळचं कुठं आहे?” या शब्दात जुहीनं दोघांमध्ये आलेला कडवटपणा बोलून दाखवला. पण पुढं हे सावरत ती म्हणाली, “आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत, याबाबत कोणतीच शंका नाही. शाहरुखच नव्हे तर सिनेमासृष्टीतील इतर मंडळींशीही मला व्यवस्थित भेट घेता येत नाही.”
डर, यस बॉस, डुप्लीकेट, राजू बन गया जेन्टलमॅन यासांरखे अनेक हिट सिनेमे या जोडीनं दिले आहेत. शाहरुखसोबत पुन्हा काम करण्याची तयारी तीनं दाखविली. पण कधी, केव्हा, कुठे, या गोष्टी शाहरुखला विचारलं तर बरं होईल, असंही जुही म्हणाली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, October 30, 2013, 12:03