शाहरुख माझा अभिनयावर जळतो- सोनू सूद, Shah Rukh jalato on my Abinaya - Sonu Sood

शाहरुख माझा अभिनयावर जळतो- सोनू सूद

शाहरुख माझा अभिनयावर जळतो- सोनू सूद
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा त्याच्या आगामी येणारा चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’च्या तयारीत आहे. या चित्रपटात सहकलाकार शाहरुख खानही प्रेक्षकांना दिसणार आहे. सोनू सूदनं सांगितले की, शाहरुख हा माझ्या नकारात्म भूमिकेच्या अभिनयावर जळतो.

आपल्या करिअरमध्ये सोनूनं नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही पद्धतीच्या भूमिका केल्या आहे. यावेळी सोनूला विचारण्यात आलंय की, तू सकारात्मक भूमिकेमध्ये का कमी दिसतो. त्यावेळी सोनूनं सांगितलं की, मी अनेक चित्रपटांमध्ये सकारात्मक भूमिका केल्या आहेत. तसंच ‘हॅपी न्यू इअर’ या आगामी चित्रपटामध्ये देखील माझी भूमिका सकारात्मक स्वरुपाची आहे. परंतु आता वेळ बदलली आहे. तुम्हाला फक्त मनोरंजन करण्याची गरज आहे, ते सकारात्मक आहे की नकारात्मक याला महत्त्व नाही.

काही दिवसांपूर्वी ‘हॅपी न्यू इअर’ या चित्रपटाची शूटिंग चालू होती. त्यावेळी शाहरुख खाननं मला सांगितलं की, ज्यावेळी तू नकारात्मक भूमिका करतो. त्यावेळी सर्वात जास्त तुझ्यावर मी जळतो. मला पण गाणं न करता नकारत्मक भूमिका करायची आहे. त्यानंतर सोनूनं सांगितलं की, मी सर्व प्रकारच्या भूमिका करण्यासाठी तयार आहे. मात्र त्या भूमिका योग्य असाव्यात. सोनू सूदनं नुकताच प्रदर्शित झालेल्या `आर ..राजकुमार` या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 2, 2014, 20:55


comments powered by Disqus