Last Updated: Friday, June 21, 2013, 11:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईबॉलिवूडचा बादशाहा बनल्यावर आता शाहरुख खान मराठी सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सिद्ध झाला आहे. पण मराठीतलं शाहरुखचं पदार्पण हे सिनेमासाठी नसून मराठी अल्बमसाठी असणार आहे.
रवी जाधव दिग्दर्शित ‘सावली’ या अल्बममधील गाण्यासाठी संगीतकार शेखर राजिवानी याने शाहरुख खानला गळ घातली. शाहरुख खान ताबडतोब तयारही झाला. या अल्बममध्ये सुनिधी चौहानही त्याच्यासोबत दिसणार आहे. तर ‘बालक पालक’ सिनेमातील चिऊ आणि अव्याही यामध्ये सिनेमातील पात्रांच्याच रूपात दिसणार आहेत.
जेव्हा शेखरने शाहरुख खानला या अल्बमची कल्पना ऐकवली, तेव्हा शाहरुख खानने लगेच काम करण्याची तयारी दर्शवली. या आल्बममधून मिळणारं उत्पन्न एका NGO ला देण्यात येणार आहे. त्यामुळे शाहरुख खानने पल्या व्स्त शेड्युलमधून वेळ काढून हा अल्बम शुट केला. आता शाहरुख खानचं हे मराठी रूप मराठी प्रेक्षकांना किती भावतंय, हे लवकरच कळेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, June 21, 2013, 11:59