शाहरूख – प्रियंका चोरी चुपके..., Shah Rukh Khan and Priyanka Chopra very much in touch?

शाहरूख – प्रियंका चोरी चुपके...

शाहरूख – प्रियंका चोरी चुपके...
www.24taas.com, मुंबई

अभिनेता शाहरूख खान आणि प्रियंका चोप्रा या दोघांच्यात चक्कर सुरू असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. गौरी खान नाराज असल्याने शाहरूखने प्रियंकापासून फारकत घेतल्याने प्रेमाची होत असलेली चर्चा संपली असे म्हटले जाते होते. मात्र, त्यांचं प्रेम संपलं असं होत नाही. शाहरूखच्या बर्थडेला चक्क प्रियंकाने भला मोठा गुच्छ पाठवून आजही विसरले नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे दोघांमधील नाजूक संबंध वृद्धींगत झाल्याचे म्हटले जात आहे.

शाहरूख-प्रियंकामधील प्रेम आजही कायम असल्याचे एका रिपोर्टद्वारे समोर येत आहे. आजही दोघं एकमेकांच्या संपर्कात आहेत. गेल्यावर्षी शाहरूख-प्रियंकाला अनेक ठिकाणी एकत्र पाहिलं होतं, दोघांना पाहून दोघांमध्ये खूप जवळीची मैत्री असल्याचं समोर आलं होतं.

शाहरूख आणि गौरीमध्ये होणाऱ्या भांडणाच्या चर्चेमुळे शाहरूख-प्रियंकाने एकमेकांपासून दूर राहण्याचं ठरवलं होतं, असं सांगितले जात होते. मात्र, याला फाटा पडल्याचे दिसून येत आहे. २ नोव्हेंबर या शाहरूखच्या वाढदिवशी प्रेमाने प्रियंका चोप्राने शाहरूखच्या कार्यालयावर फुलांचा गुच्छ पाठवला. असे असले तरी शाहरूखच्या पार्टीत येणाऱ्यांच्या लिस्टमध्ये प्रियंकाचं नावचं टाकण्यात आलं नव्हतं. बघा बुआ. नाव टाकलं तर ते अधिकृतपणे जाहीर होण्याची भिती होती. मात्र, शेवटी दोघांमधील प्रेम लपलेलं नाही. आता शाहरूख आणि प्रियंका या नात्याला काय उत्तर देतात, हे त्यांच्या तोंडून कधी समजेल याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही.

First Published: Sunday, November 4, 2012, 15:04


comments powered by Disqus