‘करण-अर्जुन’ एकत्र आले! Shah rukh Khan And Salman khan come together

‘करण-अर्जुन’ एकत्र आले!

‘करण-अर्जुन’ एकत्र आले!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शाहरुख-सलमान खान यांची अखेर गळाभेट झाली आहे. पुन्हा एकदा ‘करण-अर्जुन’ एकत्र आले आहेत. वांद्रे इथे काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत खान वॉर संपलं.

या दोघांमध्ये गेल्या 5 वर्षापासून वितुष्ट निर्माण झालं होतं. कतरिना कैफच्या बर्थडे पार्टीत दोघांच्या वादाला तोंड फुटलं.. त्यानंतर दोघे खान एकाच कार्यक्रमात समोरासमोर येणं टाळत होते.. इतकंच नाहीतर एकमेंकांशी कोणताही संवाद दोघांनी ठेवला नव्हता.

मात्र अखेर रमजानच्या निमित्ताने आयोजित इफ्तार पार्टीत दोघांनी एकमेंकांना प्रेमानं आलिंगन दिलं आणि या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. गळाभेट झाली असली तरी दोघांची मनं जुळली का हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 21, 2013, 22:19


comments powered by Disqus