Last Updated: Monday, January 27, 2014, 14:53
www.24taas.com झी मीडिया , मुबंई शाहरूख खानच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि गुडघ्याला मार लागला आहे. दोन दिवसांपूर्वी अभिनेता शाहरूख खानला चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फरहा खानच्या ` हॅपी न्यू ईयर ` चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं तेव्हा ही दुर्घटना घडली.
शाहरूखला मुंबईतील नानावटी हॉस्पिटलात नेण्यात आलं होतं. प्राथमिक उपचारानंतर शाहरूखनं चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं होतं. त्यानंतर झालेल्या वैद्यकिय चाचण्यात ही बाब स्पष्ट झाली की किंग खानच्या डाव्या खांद्याला फ्रॅक्चर आणि गुडघ्याला मार लागला आहे. दोन-तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी आता त्याला सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
शाहरूखच्यावतीनं जाहीर करण्यात आलेल्या माहितीनूसार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेली दुर्घटना किरकोळ स्परूपाची होती. त्यावेळी शाहरूखला किरकोळ दुखापती झाल्या. शाहरूखला जरूरीचे उपचार दिलेले आहेत आणि शाहरूख पूर्णपणे ठीक आहे.
यावर शाहरूखनं ट्विट केलं की ` इंशा अल्लाह सब कुछ ठीक होगा` काही चाचण्या करायच्या आहेत. त्यामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे सारं काही ठीक होईल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 26, 2014, 14:58