शाहरुखला `न्यू इअर` हॅपी नाही, शुटींगदरम्यान जखमी, Shah Rukh Khan injures himself while shooting

शाहरुखचं`न्यू इअर` हॅपी नाही, शुटींगदरम्यान जखमी

शाहरुखचं`न्यू इअर` हॅपी नाही, शुटींगदरम्यान जखमी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा आज शुटींग दरम्यान जखमी झालाय. त्याला तातडीनं जवळच्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख सध्या फराह खान दिग्दर्शित `हॅपी न्यू इअर`च्या शूटींगमध्ये व्यक्त आहे. याच सिनेमाचं शूट आज सुरू होतं. पण, शाहरुख जखमी झाल्यानं हे शूट ताबडतोब थांबविण्यात आलं.

मुंबईच्या जुहू भागातील `जे डब्ल्यू मॅरिएट` या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये `हॅपी न्यू ईअर` सिनेमातला एका सीन शूट करण्यात येणार होता. सगळी तयारीही झाली होती. शुटींगही सुरू झालं... आणि याच दरम्यान, शाहरुखनं मोठ्या जोशात येऊन हॉटेलच्या दरवाज्याजवळ दुखापत करून घेतली.

क्रू सदस्यांनी रक्त पाहिल्यानं त्याला ताबडतोब नानावटी हॉस्पीटलमध्ये हलवलं. शाहरुखच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी गौरी ही सध्या त्याच्याजवळ हॉस्पीटलमध्ये उपस्थित आहे. शाहरुखच्या रेड चिली एन्टरटेन्मेंटच्या वतीनं `सध्या शाहरुखची प्रकृती चांगली आहे` असं कळवण्यात आलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 23, 2014, 14:46


comments powered by Disqus