शाहरुखने मारला विद्याला प्रेंग्नेंसीवर टोमणा!, Shah Rukh Khan pokes fun at `pregnant` Vidya Balan!

शाहरुखने मारला विद्याला प्रेंग्नेंसीवर टोमणा!

शाहरुखने मारला विद्याला प्रेंग्नेंसीवर टोमणा!
www.24taas.com, मुंबई
हजरजबाबीपणात बॉलिवुडचा अभिनेता शाहरुख खान सर्वात पुढे असतो. असे काही क्षण आहेत की त्याने आपल्या कुशलतेचा परिचय दिला आहे. किंग खान शाहरुखने झी सिने अवॉर्ड्समध्ये अभिनेत्री विद्या बालनवर टिप्पणी करून पुन्हा एकदा आपल्या हजरजबाबीपणाचे सर्वांना कायल बनवले आहे.

झी सिने अवॉर्ड्समध्ये अभिषेक आणि रितेश देशमुख यांच्यासह मंचावर असलेल्या शाहरुख खानने विद्य बालनशी बातचित करताना आपल्या वाक्चातुर्याचा परिचय दिला.
विद्या बालन हीने चित्रपट निर्माता सुजॉय घोष यांच्या कहानी चित्रपटात गर्भवती महिलेची भूमिका वठवली होती. आणि तेव्हापासून विद्या बालनबद्दल बोलले जात होते की, तिला लवकरच आई व्हायचे आहे. त्याबद्दल ती विचार करीत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या.

विद्या बाबत या बातम्यांना विद्या आणि तिचा पती सिद्दार्थ रायने महत्त्व दिले आहे. प्रेग्नेंसीबद्दल विद्या आणि शाहरुख खानच्या या वाक्चातुर्याचे परिचय तुम्हांला २० जानेवारीला रात्री ८ वाजता झी टीव्हीवर पाहायला मिळणार आहे.

First Published: Saturday, January 19, 2013, 17:44


comments powered by Disqus