Last Updated: Tuesday, April 1, 2014, 15:23
www.zee24taas.com, झी मीडिया, मुंबई शाहरुख खाननं अनेक नवीन अभिनेत्रींसोबत चित्रपटात काम केलंय. सध्याची बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि अनुष्का शर्मा यांना शाहरुखच्या चित्रपटातमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. आता शाहरुखसोबत काम करण्यासाठी ‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपटातील अभिनेत्री वाणी कपूरला लॉटरी लागलीय.
एका वृत्तपत्रकानुसार, यश राज प्रॉडक्शनचा आगामी चित्रपट ‘फॅन’ मध्ये शाहरुख खानसोबत वाणी कपूरला साइन करण्यात आलंय. तसंच फॅन चित्रपटाचं दिग्दर्शक हे ‘बॅण्ड बाजा बारात’ आणि ‘शुद्ध देसी रोमांस’ या चित्रपटांचा दिग्दर्शक मनीष शर्माच करणार असल्याचं समजतंय.
परिणिती चोपडा आणि अनुष्का शर्मा यांचीही नावं या रोलसाठी चर्चित होती, मात्र वाणीच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. ‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपटाचाआधी वाणीने ‘बॅण्ड बाजा बारात’ चा तामीळमधील ‘आहा कल्याणम’ यामध्ये काम केलंय. याच वर्षी `फॅन` चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 1, 2014, 15:23