…जेव्हा शाहरुख जुन्या आठवणींत होतो भावूक!, Shah Rukh Khan tweets a personal photo with son Aryan Kha

…जेव्हा शाहरुख जुन्या आठवणींत भावूक होतो!

…जेव्हा शाहरुख जुन्या आठवणींत भावूक होतो!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आपल्या कुटुंबाविषयी आपली पत्नी गौरी, मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्याविषयी ट्विटरवरून आपल्या फॅन्सशी बऱ्याच गोष्टी शेअर करतो... यावेळी, तो बऱ्याचदा भावूक झालेला दिसतो.

आताही शाहरुख पुन्हा एकदा भावूक झालाय. फोटोच्या स्वरुपात टिपलेला आपल्या जीवनातील आणखी एक परमोच्च आनंदाचा क्षण त्यानं आपल्या चाहत्यांशी शेअर केलाय.

काही वर्षांपूर्वी घेतलेला हा फोटो आहे त्याचा आणि त्याचा मोठा मुलगा आर्यनचा... यामध्ये, त्यानं आनंदानं आर्यनला उचलून आपल्या हातांत घेतलंय. हा फोटो शेअर करताना शाहरुख त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो... ‘एक वेळ होती जेव्हा हे निरागस रुप मी माझ्या हातांत सामावून घेऊ शकत होतो... पण, हे आता माझ्यापेक्षाही मोठं झालंय... वेळ आणि मुलं खूप लवकर पुढे सरकतात’.




First Published: Friday, June 20, 2014, 11:17


comments powered by Disqus