Last Updated: Monday, August 12, 2013, 12:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण अभिनित दिग्दर्शक रोहीत शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’नं केवळ तीन दिवसांत शंभर करोडचा टप्पा पार केलाय. हा सिनेमा जगतातील एक विक्रमच ठरलाय. ईदच्या मुहूर्तावर चेन्नई एक्सप्रेस सिनेमाघरांत प्रदर्शित झाला होता.
बॉलिवूड व्यवसायाचे विश्लेषक तरन आदर्श यांनी सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटरवर हा खुलासा केलाय. आदर्श ट्विटरवर म्हणतो, ‘...आणि रेकॉर्ड तुटलं! चेन्नई एक्सप्रेसनं आपल्या विकेन्डच्या समाप्तीवर १०० करोडची कमाई केलीय’.
बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड जगताचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग खानच्या सिनेमांनी सिनेमागृहात खळबळ उडवून दिली नव्हती... ती कमी या सिनेमाच्या माध्यमातून पूर्ण झालीय. बॉक्स ऑफिसच्या कामगिरीबाबत माहिती देताना आदर्शनं ट्विट केलंय, ‘चेन्नई एक्सप्रेसनं गुरुवारी प्रव्ह्यूच्या माध्यमातून ६.७५ करोड, शुक्रवारी ३३.१२ करोड, शनिवारी २८.०५ करोड आणि रविवारी ३२.५० करोड रुपयांची कमाई केलीय... आणि यातूनच या सिनेमाची तीन दिवसांची १००.४२ करोड रुपयांची कमाई इतिहास ठरलीय’.
‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख आणि दीपिकाची जोडी प्रेक्षकांना दुसऱ्यांदा पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली. या अगोदर शाहरुख-दीपिकानं फराह खानच्या ‘ओम शांति ओम’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तर रोहीत शेट्टीबरोबर शाहरुखनं पहिल्यांदाच या सिनेमात काम केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, August 12, 2013, 12:36