शाहरूख खानने कापला सलमानचा रोल, Shah rukh replace salman

शाहरूख खानने कापला सलमानचा रोल

शाहरूख खानने कापला सलमानचा रोल
www.24taas.com , नवी दिल्ली


‘हम आप के है कौन’च्या दिग्दर्शकाने सिनेमाचा रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाच्या टीमशी झालेल्या चर्चेत नव्या सिनेमाचं कास्टींग पण करण्यात आलं आहे. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे, त्या पूर्वीच्या ‘प्रेम’ला म्हणजे सलमान खानला दुसरा खान शाहरूख रिप्लेस करणार आहे. होय खरचं, सलमानच्या ऐवजी शाहरूखला या सिनेमात घेण्यात आलयं.
शाहरूखच्या चाहत्यांना ही जणू मेजवानीच असली तरी प्रेमची भूमिका शाहरूख निभावणार याची खंत सलमानच्या चाहत्यांना आहे. नव्या ‘हम आप है कौन?चा पहिला लूक कसा असेल.. आणखी कोणत्या कलाकारांना या सिनेमातून वगळण्यात आलयं.. लाखो दिल की धडकन असणारी धक धक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित या सिनेमात असणार किंवा नसणार..अशा अनेक गोष्टींबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे.

बरीच दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या या सिनेमाला मॉर्डन लूक मिळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असं दिग्दर्शकाचं म्हणणं आहे. या सिनेमाने अनेक दशक चाहत्यांच लक्ष वेधून ठेवलं. या सिनेमाला त्याच्या चाहत्यांच्या सर्व वर्गातून उदंड प्रेम मिळालं आणि मिळत आहे. मग ते प्रौढ असो किंवा तरूण. तसंच नव्या ‘हम आप है कौन?’बद्दल काय घडेल हे बघत बसण्यापासून आपल्या हातात काही नाही
मग मित्रांनो कशी वाटली एप्रिल फूलची खास भेट....

First Published: Monday, April 1, 2013, 16:17


comments powered by Disqus