शाहरूख खान मुलीला बनवणार हिरोईन, Shah Rukh wants to actress daughter

शाहरूख खान मुलीला बनवणार हिरोईन

शाहरूख खान मुलीला बनवणार हिरोईन
www.24taas.com,पाचगणी

हिंदी चित्रपट अभिनेता किंग खान शाहरूख खान हा आपल्या १२ वर्षीय लाडक्या मुलीला हिरोईन बनविणार आहे. तशी त्याची इच्छा आहे. पाचगणी येथे पत्रकारांशी बोलताना शाहरूख खाननेच ही माहिती पीटीआयला दिली.

सुहाना मोठी झाल्यावर तिला अभिनेत्री झालेली पाहायचेय. मला आशा आहे की, सुहाना एक चांगली अभिनेत्री होईल. मी तिला मोठ्या पडद्यावर बघू इच्छीतो. तिला अभिनेत्री म्हणून मला पाहायचेय. माझी मुलगी अभिनेत्री झालेली पाहून मला खूप आनंद होईल, असे शाहरूखने सांगितले.

शाहरूख याला दोन मुलं आहेत. मुलगा आर्यन आणि मुलगी अर्थात सुहाना. शाहरूख नेहमीच आपल्या या लाडक्या दोन्ही मुलांबद्दल बोलत असतो. तो पाचगणीला आला असताना सुहानाला अभिनेत्री झालेली पाहायचेय, असे किंग खानने स्पष्ट केले. याआधी शाहरूख आयपीएल सामन्याच्यावेळी दोन्ही मुलांबरोबर दिलसला होता.

First Published: Thursday, March 7, 2013, 15:45


comments powered by Disqus