Last Updated: Tuesday, April 15, 2014, 14:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बॉलिवूडचा किंग खान आपल्या आगामी `हॅप्पी न्यू इअर`साठी खूप उत्सुक आहे. नुकतंच, शाहरुखनं आपली मैत्रिण आणि `हॅप्पी न्यू इअर`ची दिग्दर्शिका फराह खान हिला एक मर्सिडीज गाडी गिफ्ट केलीय.
शाहरुखनं याआधी फराहसोबत `मैं हूँ ना` आणि `ओम शांति ओम` यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. या दोन्ही सिनेमांच्या प्रदर्शनाआधी शाहरुखनं फराहला गाडी गिफ्ट केली होती. या जोडीचा तिसरा सिनेमा `हॅप्पी न्यू इअर` लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे, याही वेळेस शाहरुखनं फराहला तिसरी गाडी गिफ्ट केलीय.
फराहनं याबद्दल सोशल वेबसाईटवर आपला आणि शाहरुखचा एक फोटो पोस्ट करून गिफ्टसाठी त्याचे आभारही मानलेत.
हॅप्पी न्यू इअर या सिनेमात शाहरुखसोबत अभिषेक बच्चन, दीपिका पादूकोण, सोनू सूद, विवान शाह आणि बोमन इरानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 15, 2014, 14:28