Last Updated: Thursday, January 24, 2013, 10:12
www.24taas.com, मुंबई बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर परदेशांतही चर्चेचा विषय ठरलाय. काही ना काही कारणामुळे शाहरुख नेहमीच चर्चेत असतो. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर शाहरुख खानचं वर्चस्व दिसणार आहे.
‘फोर्ब्स’ मॅगझिनच्या येत्या अंकाच्या कव्हर पेजवर शाहरुख खानचा फोटो झळकणार आहे. असं जर घडलं, तर शाहरुख हा पहिला भारतीय अभिनेता असेल, ज्याला फोर्ब्सच्या कव्हर पेजवर झळकण्याची संधी मिळेल.
सूत्रांच्या माहितीनुसार, ‘फोर्ब्स’ या जगभरात लोकप्रिय ठरलेल्या मॅगझिनच्या येत्या अंकात १०० हून अधिक लोकप्रिय लोकांचा समावेश केला गेलाय आणि यामध्येच शाहरुखला कव्हर पेजवर जागा मिळालीय. भारतीय बाजारपेठेत ‘फोर्ब्स’नं प्रवेश करून आता चारहून अधिक वर्ष झालेत आणि या मॅगझिनच्या कव्हर पेजवर जागा मिळवणारा शाहरुख हा पहिलाच अभिनेता असेल.
First Published: Thursday, January 24, 2013, 10:12