शाहरुख खानला मोबाइल फोन वापरण्यास बंदी!, Shahrukh Khan will not use the mobile phone!

शाहरुख खानला मोबाइल फोन वापरण्यास बंदी!

शाहरुख खानला मोबाइल फोन वापरण्यास बंदी!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

ही बातमी खरी आहे. आता शाहरुख खान याच्या मोबाइल वापरावर बंदी आली आहे. शाहरुख बरोबरच अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण आणि बोमन ईरानी यांच्याही यात समावेश आहे.

`हॅप्पी न्यू इअर` हा फराह खानचा नवीन सिमेना येत आहे. या सिमेनाच्या सेटवर मोबाइलचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. फिल्म निर्माताने सेटवर फोन वापरण्यावर बंदी केली आहे. हा नियम डायरेक्टर फराह खान आणि निर्माता यांनाही लागू आहे. कारण शुटींगच्यावेळी त्यांना कोणाती अडचण भासू नये. तसेच सेटचा लूक बाहेर जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. अनेकवेळा शुटींगचे फोटो लीक होण्याच्या घटना घडल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे.

या सिनेमाच्या बॅकग्राऊंडसाठई बाहेरून डान्सर बोलविण्यात आले होते. मात्र, या बॅकग्राऊंडचे फोटो लीक झाले होते. त्यामुळे निर्मार्ते नाराज झाले होते. त्यामुळे यापुढे खबरदारी घेण्यात आली आहे. आता कोणतेही शुटींग लीक होऊ नये, अशी निर्मात्याची इच्छा आहे. त्यामुळे सिनेमा सेटवर मोबाइल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एकूणच फोटो लीकची गंभीरता घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 26, 2014, 11:31


comments powered by Disqus