काश्मिरमध्ये शाहरुख झाला भावूक Shahrukh misses his father in Kashmir

काश्मिरमध्ये शाहरुख झाला भावूक

काश्मिरमध्ये शाहरुख झाला भावूक

www.24taas.com, श्रीनगर

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या यश चोप्रा यांच्या फिल्मचं शुटिंग करण्यासाठी काश्मिरच्या पेहलगामला गेला आहे. येथे काश्मिरच्या खोऱ्यात शुटिंग करताना शाहरुख खान भावूक झाला.

ट्विटरवर आपल्या काश्मिरसंदर्भात भावना व्यक्त करताना शाहरुखने लिहिलं आहे, “माझ्या वडलांची अशी इच्छा होती, की मला काश्मिरच्या खोऱ्यात फिरायला घेऊन जावं. पण ते हयात असताना तो योग आला नाही. आत्ता मी काश्मिरमध्ये आहे. या क्षणी ते माझ्यासोबत आहेत, असंच मला वाटतंय.”

शाहरुख खान इतक्या वर्षांमध्ये प्रथमच काश्मिरमध्ये आला आहे. येथे तो आपल्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात शाहरुख समर नामक लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा या त्याच्या सहकलाकार आहेत. शाहरुख बरोबर १०० हून अधिक लोकांचं युनिट सिनेमानिमित्त पेहेलगम येथे उतरल्याने संपूर्ण काश्मिर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. शाहरुखसोबतही सतत काही सुरक्षारक्षक आहेत.

First Published: Wednesday, August 29, 2012, 16:47


comments powered by Disqus