Last Updated: Monday, October 29, 2012, 08:50
www.24taas.com, मुंबईसाधारणतः एखाद्या लग्न सोहळ्याला किंवा त्यानंतरच्या मेजवानी आपल्याला बोलावलं, तर आपण आपल्या ऐपतीप्रमाणे चांगले कपडे घालून जातो. त्यात जर सेलिब्रिटींची पार्टी असेल, तर सेलिब्रिटी जास्तच भरजरी आणि चांगले कपडे घालून नव विवाहीत जोडप्याला शुभेच्छा देतात. मात्र सेलिब्रिटी जर शक्ती कपूर असेल, तर?
बॉलिवूडमधील नामांकीत आणि गंभीर प्रकृतीचे दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी आपल्या मुलाच्या विवाहाप्रीत्यर्थ पार्टी आयोजित केली होती. पार्टीला रीना रॉय, पूनम सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा इत्यादी कलाकार मंडळी हजर होती. चित्रपटात भडक कपडे घालून वावारणारा गोविंदाही या पार्टीत सुटा बुटात उपस्थित होता. पण शक्ती कपूर मात्र या पार्टीत अवतरला तोच विचित्र पोषाखात...
शक्ती कपूर यांनी डार्क निळी जीन्स परिधान केली होती. तसंच पायातले बूट्सही अतरंगी होते. यात भर म्हणजे डार्क निळ्या जीन्सवर डार्क नेव्ही ब्ल्यू टी-शर्ट घातला होता.तो ही खांद्याच्या दिशेने फाडून ठेवल्यासारखा वाटत होता. हे त्याच्या टी-शर्टचं डिझाइन होतं. यावर त्याने पांढरा कोटही घातला होता. पण तो नुसताच हाता घेऊन शक्ती रकपूर फिरत होता. यावर त्याने पिवळ्या रंगाचा गॉगल घातला होता. शक्ती कपूरचा हा अवतार पाहून सगळेच गालातल्या गालात हसत होते. ज्या जोडप्याला शुभेच्छा द्यायला शक्ती अशा अवतारात आला होता, ती नववधू शक्ती कपूरला पाहून नक्कीच घाबरली असणार!
First Published: Monday, October 29, 2012, 08:49