सनी लिओनवर शांतिनं केला चोरीचा आरोप..., Shanti Dynamite accuses Sunny Leone of copying her

सनी लिओनवर शांतिनं केला चोरीचा आरोप...

सनी लिओनवर शांतिनं केला चोरीचा आरोप...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्लेबॉय पत्रिकेची मॉ़डल शांति डायनामाइट हिनं अभिनेत्री सनी लिओन हिच्यावर चोरीचा आरोप केलाय. सनीनं आपली स्टाईल चोरल्याचं शांतिचं म्हणणं आहे.

सनीनं तिच्या `बेबी डॉल` या नव्या गाण्याच्या पोस्टरवर आपली नकल केलीय आणि यामुळे आपण खूप चिंतेत आहोत, असं शांति डायनामाइट हिनं म्हटलंय.

ब्रिटनमध्ये राहणारी शांति मूळ रुपात भारतीय-यूनानी माता-पित्याची मुलगी आहे. ती एका चॅट शोची प्रस्तुतकर्तादेखील आहे. तसंच शांतिला हिंदी सिनेमांमध्ये काम करण्याचीदेखील इच्छा आहे.

`अनेक जणांनी मला सांगितलं की, तुम्ही सनी लिओनचा नवा सिनेमा रागिनी एमएमएस-२ मधलं बेबी डॉल हे गाणं पाहायला हवं... तिनं तुमचीच नकल केलीय... म्हणून मी पाहिलं आणि मी हैराण झाले` असं शांतिनं पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

`मला वाटलं... अरे देवा! लोक असं पण करतात? माझ्यासाठी ही खूप चिंतेची गोष्ट आहे कारण, कुणीही इतर कुणाच्या विचारांची नकल करून लोकप्रियता मिळवणं, ही काही चांगली गोष्ट नाही` असंही शांति म्हणतेय.

यावेळी शांति आपलं एक जुनं पोस्टरदेखील घेऊन आली होती. `बेबी डॉल`चं पोस्टर आपल्या या पोस्टरची नकल असल्याचं शांतिचं म्हणणं आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 19, 2014, 09:32


comments powered by Disqus