Last Updated: Tuesday, April 23, 2013, 15:20
www.24taas.com, मुंबई रिअॅलिटी शोचा बादशाहा ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनबाबतीत नेहमीच सगळ्यांना उत्सुकता असते. नव्या पर्वाचे नवे स्पर्धक कोण?...नवीन पर्व कसं असेल?...असे अनेकांना गॉसिप करण्याचे विषय मिळतात. पण त्यात भर पडली आहे आणखी एका गौप्यस्फोटाची.
मनोरंजन विश्वातील रिअॅलिटी शो ‘बीग बॉस’चा शिल्लेदार सलमान खान नवीन सीझनमध्ये दिसणार नाही. सलमानच्याऐवजी त्याचाच प्रतिस्पर्धी शाहरूख खानच्या नावाची वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या सलामान त्याचा आगामी सिनेमा ‘मेंटल’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘मेंटल’ हा सिनेमा पुढच्या वर्षीच्या सुरूवातीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं शुटींग लवकरात लवकर संपविण्यामध्ये सलमाने भर दिला आहे. कारण त्यानंतर सलमानला आपल्या चेहऱ्याच्या मांसपेशीच्या दुखण्यावर इलाज करून घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा संकेत एकच की, सलमान ‘बिग बॉस ७’मध्ये दिसणार नाही.
सलमानने ‘बिग बॉस’च्या सीझन ४,५,६ चे सूत्रसंचालन करून त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवले होते. सलमानचे चाहते त्याला ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनमध्ये पाहू इच्छित होते. परंतु त्यांच्या पदरी फक्त निराशाच लागली आहे.
या सगळ्यामध्ये सलमानला जेवढं मानधन मिळत होते तेवढचं शाहरूखला मिळणार का?...की त्यापेक्षाही जास्त मानधन मिळणार आहे?...या आणि अशा अनेक गोष्टींबाबत चर्चा रंगाताना दिसत आहे.
First Published: Tuesday, April 23, 2013, 14:57